महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कुलभूषण जाधव यांना राजनैतिक भेटीची परवानगी मिळाली - कुलभूषण जाधव

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला कुलभूषण जाधव यांना राजनैतिक भेटीची परवानगी देण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कुलभूषण जाधव

By

Published : Aug 2, 2019, 8:20 AM IST

नवी दल्ली - हेरेगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानात अटक असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने राजनैतिक माध्यमातून भेटीची परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर पाकिस्तानने ही सुविधा दिली आहे. पाकिस्ताने या निर्णयाची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला दिली आहे.

या निर्णयाबाबत पाकिस्तानने गुरुवारी भारताशी संपर्क साधल्याच्या वृत्ताला परराष्ट्र मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. राजनैतिक भेटीची परवानगी देण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. हा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाशी आम्ही तपासून पाहत आहोत. पाकस्तानशी या बाबत राजनैतिक मार्गाने संपर्क साधण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितले.

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाला कुलभूषण जाधव यांना राजनैतिक भेटीची परवानगी देण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे, असे पाकिस्तान परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी इस्लामाबाद येथे पत्रकार परिषदेत सांगितले. या निर्णयावर भारताचे उत्तर आले नसल्याचे पाकिस्तानने स्पष्ट केले. शुक्रवारी दुपारी ३ वाजता कुलभूषण जाधव यांना राजनैतिक अधिकारी भेटू शकतो, अशी माहिती मिळत आहे.

व्हिएन्ना करारानुसार देण्यात येणाऱ्या राजनैतिक भेटीच्या हक्काबाबत कुलभूषण जाधव यांना माहिती देण्यात आली आहे, असे पाकिस्तानने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानी कायद्यानुसार कुलभूषण यांच्या खटल्यावर निर्णय घेतला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

आंतराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या खटल्यावर १७ जुलैला निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवली. मार्च २०१६ मध्ये अटक केल्यापासून पाकिस्तान कुलभूषण यांना भारतीय अधिकाऱयांशी भेटू देत नव्हता. आता राजनैतिक भेटीची परवानगी मिळाल्याने भारताला त्यांच्या सुटकेची आशा निर्माण झाली आहे. पाकिस्तान लष्करी न्ययालयाने हेरेगिरीच्या आरोपाखाली जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details