महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कृष्णास्वामी नटराजन बनले भारतीय तटरक्षक दलाचे नवे महासंचालक - indian coast guard

कृष्णास्वामी वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे एलुमिनी (माजी विद्यार्थी) आहेत. त्यांना २०११ मध्ये राष्ट्रपति तथागत पदक (विशिष्ट सेवा) आणि १९९६ मध्ये टाट्रास्क पदक (मेधावी) हे सन्मान मिळाले आहेत.

कृष्णास्वामी नटराजन

By

Published : Jun 30, 2019, 9:00 PM IST

नवी दिल्ली - कृष्णास्वामी नटराजन यांची भारतीय तटरक्षक दलाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी राजेंद्र सिंह यांच्या कडून आज पदभार स्वीकारला. सिंह आज सेवानिवृत्त झाले. नटराजन १८ जानेवारी, १९८४ ला सेनेत नियुक्त झाले होते. त्यांच्याकडे मद्रास विद्यापीठाची संरक्षण आणि युद्ध अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी आहे.

कृष्णास्वामी वेलिंग्टनच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजचे एलुमिनी (माजी विद्यार्थी) आहेत. त्यांनी यूएस कोस्ट गार्ड रिझर्व्ह ट्रेनिंग सेंटर, यॉर्कटाउन, व्हर्जिनिया येथून शोध आणि बचावासह समुद्रातील सुरक्षा आणि बंदरावरील पथकाचे संचलन यामध्ये प्राविण्य मिळवले आहे.

नटराजन यांनी तटरक्षक दलात जहाज आणि तट या दोहोंवरही वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यांची १२ ऑगस्ट २०१६ मध्ये अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. ते सध्या तटरक्षक कमांडर (पश्चिम सीबोर्ड) येथील जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना २०११ मध्ये राष्ट्रपति तथागत पदक (विशिष्ट सेवा) आणि १९९६ मध्ये टाट्रास्क पदक (मेधावी) हे सन्मान मिळाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details