महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 8, 2020, 6:02 PM IST

ETV Bharat / bharat

केरळ विमान अपघात: 'धावपट्टी 10 च्या धोक्याची DGCA ला पूर्वकल्पना, मात्र, उपाययोजना केल्या नाहीत'

विमान सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी 17 जून 2011 रोजी नागरी उड्डान सचिव नसिम जैदी आणि नागरी उड्डान महासंचालक भारत भूषण यांना पत्र लिहले होेते. धावपट्टी 10 वर विमान उतरत असताना जर विमानाच्या मागच्या बाजूने वारा वाहत असेल आणि पाऊस असेल तर प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे पत्रात म्हटले होते.

विमान अपघात
विमान अपघात

नवी दिल्ली -केरळमधील कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल(शुक्रवार) एअर इंडियाचे विमान लँड होत असताना अपघातग्रस्त झाले. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. विमान धावपट्टीवरून घसरून 35 फूट खोल दरीत कोसळले. आता या अपघाताची चौकशी सुरु आहे. हा अपघात टाळता आला असता का? यावर चर्चा सुरु आहे. धावपट्टीच्या धोक्याबाबत 2011 साली एका सुरक्षा तज्ज्ञाने लिहलेले पत्र आता समोर आले आहे.

विमानतळावरील धावपट्टी 10 वर विमान लँड होत असताना असलेल्या धोक्याबाबतचा इशारा या पत्रात देण्यात आला होता. विमान सुरक्षा तज्ज्ञ कॅप्टन मोहन रंगनाथन यांनी 17 जून 2011 रोजी नागरी उड्डान सचिव नसिम जैदी आणि नागरी उड्डान महासंचालक भारत भूषण यांना पत्र लिहले होेते. धावपट्टी 10 वर विमान उतरत असताना जर विमानाच्या मागच्या बाजूने वारा वाहत असेल आणि पाऊस असेल तर प्रवाशांच्या जीवाला धोका असल्याचे पत्रात म्हटले होते. मात्र, यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

कोझिकोड विमानतळावरील धावपट्टी प्रमाणीत नियमांपेक्षा फक्त निम्म्याच लांबीची आहे. हे नागरी विमान वाहतूक विभागाला माहिती होते. मात्र, मागील अनेक वर्षांपासून फक्त तपासणी आणि सुरक्षा पडताळण्यात येत आहे. या पत्रात 2010 साली एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमान अपघाताचा दाखला देण्यात आला होता, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

इंटरनॅशनल फांऊडेशन फॉर ए‌व्हिएशन एरोस्पेस अ‌ॅन्ड ड्रोन संस्थेचे संचालक, सनत कौल म्हणाले, शुक्रवारी विमान उतरत असताना हवामान खराब होते. तसेच विमानाच्या पाठीमागून वारा वाहत असल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानतळ प्रशासनाने मान्सूनमध्ये विमान उतरण्यास परवानगी द्यायला नको होती. तसेच सरकार मँगलोर विमान अपघातातून काहीही शिकले नाही.

विमान क्षेत्रातील आणखी एक तज्ज्ञ मार्क मार्टिन म्हणाले, खराब हवामानामुळे विमान दुसऱ्या विमानतळावर उतरवायला हवे होते. लँडिंगच्या पहिल्या प्रयत्नानंतर विमान मुंबई, बेंगलोर किंवा हैदराबादला न्यायला हवे होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तसे केले नसावे. किनारी भागातील विमानतळे मुख्यतहा पश्चिम किनाऱ्यावरील विमानतळे दुसरीकडे हलवायला हवीत. विमानतळे उंच भागात(टेबलटॉप) नसायला हवीत, असे मार्टीन म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details