मेष -आज आपणास आपला संताप नियंत्रित ठेवावा लागेल. कोणत्याही कामात व्यत्यय येण्यास हा संताप कारणीभूत ठरेल. शरीरात उत्साहाची उणीव भासेल. मनाची अस्वस्थता कोणतेही काम करण्याची प्रेरणा देणार नाही. एखाद्या मंगल प्रसंगात सहभागी व्हाल. एखादा प्रवास संभवतो. नोकरीच्या ठिकाणी व कुटुंबात मतभेद होतील.
वृषभ -आज कार्यपूर्तीस होणारा विलंब व शारीरिक अस्वास्थ्य ह्यामुळे मनात नैराश्याची भावना बळावेल. कामाचा व्याप वाढल्याने मानसिक बेचैनी राहील. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता आहे. आज नवे काम आज सुरू करू नये. आपल्या खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्य मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
मिथुन -आज शारीरिक व मानसिक उत्साहामुळे प्रसन्नता लाभेल. मित्र व कुटुंबीयांसह प्रवास किंवा मेजवानीचा बेत ठरवाल. मनोरंजनाची सर्व साधने आज उपलब्ध होतील. भारी वस्त्रे, स्वादिष्ट भोजन व वाहन सुख मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित व्हाल.
कर्क -आजचा दिवस यशदायी व आनंददायी आहे. कुटुंबियांसह घरात सुखा - समाधानात दिवस घालवाल. नोकरदारांना लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल. कार्यात यश मिळेल. स्त्रीयांच्या सहवासात आनंदित व्हाल. आपल्या आधीन असणार्या व्यक्ती व सहकारी ह्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृती उत्तम राहील.
सिंह -आज आपणास लेखन व साहित्य क्षेत्रात काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. विद्यार्थी अभ्यासात चमकतील. प्रणयातील यश व प्रिय व्यक्तीशी झालेला सुसंवाद आपले मन आनंदित करेल. स्त्री वर्गाकडून अधिक सहकार्य मिळेल. शरीर प्रकृती उत्तम राहील. परोपकाराचे कार्य करण्यात धन्यता वाटेल.
कन्या -आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. अभ्यासाच्या दृष्टीने काळ चांगला नाही. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादी संबंधित समस्या उदभवतील. पैसा खर्च होईल.