मेष -आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार - विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार - विमर्श कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आई व स्त्री वर्गाकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्याने अस्वस्थ राहाल.
वृषभ -आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्या कडून सुखद बातमी मिळाल्याने मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार - व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
मिथुन -आज कोणत्याही प्रकारच्या संकटापासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. प्रकृती चांगली राहणार नाही. दिलासा मिळण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील.
कर्क -आज आपण मौज - मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट भोजन लाभेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यांची खरेदी होईल. वाहनसुख मिळेल. सार्वजनिक क्षेत्रात मान मिळेल. व्यावसायिक भागीदारीत लाभ होईल. भिन्नलिंगी व्यक्तींचे आकर्षण राहील. प्रेमिकांना प्रणयात सफलता प्राप्त होईल.
सिंह -आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.
कन्या -आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.