मेष -आज आपणास एक वेगळाच अनुभव येईल. एखादी गूढ विद्या व त्यांसंबंधीत गोष्टींचे आकर्षण वाटेल. आज एखाद्या विषयात आपण प्रावीण्य मिळवू शकाल. वाणी व द्वेष भावना ह्यांवर आवर घालावा लागेल. शक्यतो नवीन कार्यारंभ करू नये. प्रवासात त्रास संभवतो.
वृषभ -आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. स्नेह्यांसह उत्तम भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. विदेशातील मित्रां कडून आनंददायी बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल. व्यापार्यांना व्यापारात वृद्धी होईल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत यश व प्रतिष्ठा मिळेल.
मिथुन -आजचा दिवस कार्यपूर्ती, यश व कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. घरात सुखाचे व शांतीचे वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. आज खर्च होईल पण तो अनावश्यक वाटणार नाही. अडलेली कामे पूर्ण होण्याचा मार्ग सापडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातील रागावर आवर घालण्याची मात्र आवश्यकता आहे.
कर्क -आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही. पोटाच्या व पचनाच्या तक्रारी त्रास देतील.
सिंह -आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अती संवेदनशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. अपघाताची शक्यता असल्याने शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. नोकरीतील वातावरण चिंताग्रस्त राहील. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल.
कन्या -आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. एखाद्या विषयात प्रावीण्य प्राप्त होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांचा जोमाने प्रतिकार करावा लागेल.