महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

किरण मजुमदार शॉ यांना यंदाचा जागतिक उद्योजक पुरस्कार

मजूमदार-शॉ यांना यापूर्वी 2002 मध्ये हेल्थकेअर अँड लाइफ सायन्सेस पुरस्कार, फेब्रुवारी 2020 मध्ये ईवाय एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया 2019 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी डब्ल्यूईओई 2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

Kiran Mazumdar- Shaw
किरण मजुमदार- शॉ

By

Published : Jun 5, 2020, 4:48 PM IST

बंगळूरू- बायोकोन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मजुमदार-शॉ यांना गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या आभासी वर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात यंदाचा जागतिक उद्योजक पुरस्कार देण्यात आला. यावेळी बायो फार्मास्युटिकल्स कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की 41 देश आणि प्रांतामधील 46 ईओवाय देश पुरस्कार विजेत्यांच्या विशिष्ट यादीमधून त्यांना या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

पुरस्काराच्या 20 वर्षांच्या इतिहासात मजुमदार-शॉ ही भारतातील पहिली महिला उद्योजक आणि तिसऱ्या भारतीय आहे, ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. 2011 मध्ये हा पुरस्कार जिंकणार्‍या सिंगापूरच्या हायफ्लक्स लिमिटेडच्या ओलिव्हिया लंपनंतर हे विजेतेपद मिळवणारी त्या जगातील दुसरी महिला आहेत. कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक (2014)) आणि इन्फोसिस लिमिटेडचे ​​सहसंस्थापक एन. आर. नारायण मूर्ती (2005) यांच्या नंतर त्या तिसऱ्या भारतीय विजेत्या आहेत.

मजूमदार-शॉ यांना यापूर्वी 2002 मध्ये हेल्थकेअर अँड लाइफ सायन्सेस पुरस्कार, फेब्रुवारी 2020 मध्ये ईवाय एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया 2019 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी डब्ल्यूईओई 2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details