सुकमा -छत्तीसगढमधील सुकमा येथे तेलंगणाच्या चेरला मंडलमधील टीआरएस नेता श्रीनिवास राव यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे. ८ जुलैला श्रीनिवास यांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते.
टीआरएस नेता श्रीनिवास राव यांची नक्षलवाद्यांकडून हत्या - killed by maoists
तेलंगणाच्या चेरला मंडलमधील टीआरएस नेता श्रीनिवास राव यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.
श्रीनिवास राव
आरएस नेता श्रीनिवास राव यांनी आदिवासींची ७० एकर जमीन हडपल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. याचबरोबर त्यांच्यावर पोलिसांचा खबऱ्या असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे.
नक्षलवाद्यांच्या शबरी एरीया या संघटनेने श्रीनिवास यांची हत्या केल्याची जबाबदारी घेतली आहे. ह्त्या केल्यानंतर श्रीनिवास यांचे शव छत्तीसगढमधील स्टाराम ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पुटेपाड क्षेत्रामध्ये फेकले आहे.