महाराष्ट्र

maharashtra

राज्यसभा निवडणूक : काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा कर्नाटकमधून उमेदवारी अर्ज

By

Published : Jun 8, 2020, 5:48 PM IST

मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी व विधानसभेचे सचिव एम. के. विषलक्षी यांच्याकडे आपले अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धरामैया यांच्या नेतृत्वात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती. त्यानंतर शिवकुमार यांनी खर्गे यांना 'बी-फॉर्म' दिला.

मल्लिकार्जुन खर्गे, Mallikarjun kharge rajyasabha
Mallikarjun kharge

बंगळुरू- कर्नाटकातील राज्यसभेच्या चार जागांसाठी19 जूनला निवडणूक होत असूनकाँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज कर्नाटक येथून आपला उमेद्वारी अर्ज दाखल केला. यावेळी केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरमैया आणि अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थितीत होती.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी निवडणुकीचे रिटर्निंग अधिकारी व विधानसभेचे सचिव एम. के. विषलक्षी यांच्याकडे आपले अर्ज सादर केले. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सिद्धरामैया यांच्या नेतृत्वात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली होती. त्यानंतर शिवकुमार यांनी खर्गे यांना 'बी-फॉर्म' दिला. 5 जून रोजी काँग्रेसने राज्यसभेसाठी मल्लिकार्जुन खर्गे यांची उमेदवारी जाहीर केली होती.

काँग्रेसचे राजीव गौडा आणि बी.के हरिप्रसाद तसेच भाजपाचे प्रभाकर कोरे आणि जेडीएसचे डी. कुपेंद्र रेड्डी यांचा राज्यसभेचा कार्यकाळ 25 जूनला पूर्ण होत आहे. त्यामुळे कर्नाटकातील या 4 रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे.

कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे 68 आमदार असल्याने काँग्रेस स्वबळावर 4 पैकी एक जागा मिळवू शकते, त्यामुळे खर्गे यांचा विजय पक्का समजला जात आहे. खर्गे हे 9 वेळा आमदार आणि 2 वेळा लोकसभेचे सदस्य होते. मागील लोकसभेत खडगे हे फ्लोअर लीडर देखील होते. ते यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय रेल्वे आणि कामगार मंत्री देखी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details