दिसपूर -एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असणारे आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आता पर्यटकांसाठी खुले होण्यास सज्ज झाले आहे. २१ ऑक्टोबरपासून पर्यटकांना या उद्यानाची सफर करता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल आणि वनमंत्री परिमल शुक्ला हेदेखील याचदिवशी या उद्यानाची सफर करणार आहेत.
यापूर्वी पाच ऑक्टोबरला उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्याचा विचार प्रशासन करत होते. मात्र, महापुरामुळे हा निर्णय पुढे ढकलावा लागला. यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे उद्यान पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते.
कोरोनासाठी विशेष खबरदारी..