बडगाम : जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे पार पडलेल्या भारतीय सैन्याच्या भरती प्रकियेला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे. लष्करात भरती झाल्याने देशाची सेवा करण्याची संधी मिळेल, अशी भावना काश्मीरी तरुणांनी व्यक्त केली आहे.
भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी
जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथे पार पडलेल्या भारतीय सैन्याच्या भरती प्रकियेला काश्मिरी तरुणांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.
भारतीय सैन्यदलात दाखल होण्यासाठी हजारो काश्मिरी तरुणांची गर्दी
'मी शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झालो आहे. मी लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो तर देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळेल', असे असीम अहमद याने म्हटले आहे. याचबरोबर त्याने राज्यातील तरुणांना देशाची सेवा करण्यासाठी सैन्यदलात भरती होण्याचे आवाहन केले आहे.
जवळपास ९५७ तरुण शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाले असून आज त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली आहे.