नवी दिल्ली - पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर विविध राज्यांमध्ये काश्मिरी तरुणांवर हल्ले करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह १० राज्यांना या विषयी दाखल झालेल्या याचिकांवर माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाची केंद्रासह १० राज्यांना नोटीस; काश्मिरी तरुणांवरील हल्ल्याची मागितली माहिती - सर्वोच्च न्यायालय
काश्मिरी तरुणांवरील हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह १० राज्यांना सर्वोच्च न्यायालयात या विषयी दाखल झालेल्या याचिकांवर माहिती देण्यासाठी नोटीस पाठवली आहे.
न्यायालय1
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण होत आहे. महाराष्ट्रात यवतमाळ, पुणे येथे काश्मिरी विद्यार्थ्यांना, नागरिकांना मारहाण करण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गुरुवारी तरुणांना मारहाण करण्यात आली होती. तर, आज पुण्यात काश्मिरी पत्रकारावर हल्ला करण्यात आला.