नवी दिल्ली : जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव मंजूर केला आहे. संघटनेच्या सर्वसाधरण सभेमध्ये हा ठराव पास करण्यात आला. तसेच सर्व काश्मीरी नागरिक भारतातील इतर नागरिकांसारखेच देशवासीय आहेत. विभाजनवादी चळवळ देशासाठी आणि काश्मीरींसाठीही घातक असल्याचं संघटनेने म्हटले आहे.
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, एकात्मतेशी तडजोड नाही - जमात-उलेमा-ए-हिंद - जमात-उलेमा-ए-हिंद
जमात-उलेमा-ए-हिंद संघटनेने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव मंजूर केला आहे.
जमात-उलेमा-ए-हिंद
आज आम्ही काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव पास केला आहे. देशाची एकात्मता आणि सुरक्षेबरोबर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भारत आमचा देश आहे, आम्ही आमच्या देशाबरोबर उभे राहण्यास तयार आहोत, असे संघटनेचे मोहम्मद मदानी यांनी म्हटले आहे.
जमात-उलेमा-ए-हिंद संघटना १९१९ साली स्थापन झाली आहे. 'देवबंद स्कुल ऑफ थॉट्स' च्या विचारधारेतून या संघटनेची स्थापना झाली आहे.