नवी दिल्ली - माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. राजकीय सूड उगवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईविरोधात आम्ही कायदेशीर लढाई लढणार आहोत, असे कार्ती यांनी स्पष्ट केले.
आयएनएक्स मीडिया प्रकरण : राजकीय सूड उगवण्यासाठी ही कारवाई - कार्ती चिदंबरम
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले आहे.
चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ती यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणाशी आमच्या कुटुंबाचा कोणताही संबंध नसताना आम्हाला यामध्ये फसवलं जात आहे. काँग्रेस पक्ष आमच्यासोबत खंबीरपणे उभा असून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पाठिंबा दिल्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, असे ते म्हणाले आहेत.
देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स माध्यम व्यवहार प्रकरणी सीबीआय पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यापुर्वी आपन निर्दोष असल्याचं चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते.