नवी दिल्ली - कर्तारपूर कॉरिडॉर संबंधित अनेक मुद्यांवर आज वाघा बॉर्डर येथे भारत-पाक यांच्यात चर्चा झाली. बैठकीत भारत-पाक यांच्यात ८० टक्के मुद्यांवर सहमती झाली आहे. उर्वरित मुद्यांवर अजून एक बैठक होऊ शकते, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी दिली आहे.
कर्तारपूर कॉरिडॉर बैठक संपली; ८० टक्के मुद्यांवर दोन्ही देशांत सहमती - मोहम्मद फैसल
नोव्हेंबर २०१९ पूर्वी गुरू नाननक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी हा कॉरिडॉरचे टर्मिनल्स पूर्ण करण्याची योजना आहे. तर, सप्टेंबर महिन्यापर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
कर्तारपूर कॉरिडॉर बैठकीत दोन्ही बाजूकडून २०-२० अधिकारी उपस्थित होते. बैठकीत भारताने कॉरिडॉर वर्षभरासाठी भक्तांसाठी खुला ठेवण्यात यावा, अशी मागणी केली. यासोबत भक्तांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेसाठी काउंसिलरची नेमणूक करण्याचीही मागणी केली. बैठकीत झीरो प्वॉइंटवर प्रवास करणाऱ्या भक्तांच्या संख्येवरही चर्चा करण्यात आली. यासोबतच प्रवाशांच्या प्रवासासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि प्रवासासाठी परवानगी मागणाऱ्या भक्तांच्या संख्येवरही चर्चा झाली. भारतातून रोज ५ हजार भक्तांना प्रवेश देण्यात यावा. तर, विशेष दिवशी १० हजार भक्तांना व्हिसामुक्त प्रवेश देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली.
पाकिस्तानातील गुरदासपूर जिल्ह्यात असणारा डेरा बाबा नानक साहिब येथे शिख बांधवांना जाण्यासाठी कर्तारपूर कॉरिडॉरमुळे मोठी मदत मिळणार आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात दोन्ही देशांनी कॉरिडॉरला मंजुरी दिली होती. नोव्हेंबर २०१९ पूर्वी गुरू नाननक देव यांच्या ५५० व्या जयंतीपूर्वी कॉरिडॉरचे टर्मिनल्स पूर्ण करण्याची योजना आहे. तर, सप्टेंबर महिन्यापर्यंत महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. भारताकडून कॉरिडॉरचे काम जलदगतीने चालू आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे कॉरिडॉरचे काम सुरू आहे. कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर जवळपास ५ हजार भक्तांना याचा फायदा होणार आहे.