महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आमच्या संयमाचा अंत पाहू नका, गोध्रानंतर काय झालं ते आठवा,  भाजप मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य - नागरिकत्व सुधारणा कायदा

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यंक समुहाविरोधात कर्नाटकातील मंत्री सी.टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

CAB protest
सी.टी. रवी

By

Published : Dec 21, 2019, 2:17 PM IST

बंगळुरू - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन होत आहे. या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यंक समुहाविरोधात कर्नाटकातील मंत्री सी. टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

बहुसंख्य नागरिक जेव्हा संयम गमावतात, तेव्हा काय होत हे पाहायचं असेल तर गोध्रा नंतर काय झाल ते आठवा. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असे ते एका व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही होत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. उत्तरप्रदेशात आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. दिल्लीमध्ये पोलिसांनी आज (शनिवारी) १५ जणांना तोडफोड केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details