शिमोगा - माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यावर '७ जागांवर लढणारे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहात आहेत,' असा टोला भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी लगावला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपले वडील आणि माजी पंतप्रधान देवेगौडा हे मोदींपेक्षा चांगले प्रतपप्रधान असल्याचा दावा केला होता. त्यावर येडियुराप्पा यांनी पलटवार केला आहे.
कुमारस्वामी यांनी यानंतर राहुल गांधींचे नाव पुढे करत ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याचे म्हटले होते. तर, देवेगौडा हे त्यांचे सल्लागार होतील, असे ते पुढे म्हणाले होते. यावर '७ जागां लढवणारे पंतप्रधान पदाचे किंवा पंतपप्रधानांच्या सल्लागार पदाचे स्वप्न पाहात असल्याचा' टोला येडियुराप्पा यांनी लगावला.