बंगळुरु -कोरोना विषाणूने जगभरामध्ये थैमान घातले असून भारतामध्येही हात-पाय पसरायला सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगत कर्नाटक सरकारने राज्यातील सातवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित केल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणूची लागण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा कहर.. कर्नाटकात सातवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित - कोरोना अपडेट
कर्नाटक सरकराने राज्यातील सातवी ते नववीच्या वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यात कोरोना विषाणूची लागण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सातवी, आठवी व नववीची वार्षिक परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगीत करण्यात आली आहे. परीक्षेची सुधारीत तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. तसेच ही सूचना खासगी आणि विनाअनुदानित शाळांनाही लागू आहे, असे पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान दहावी वर्गाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. साथीच्या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारने सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांना आधीच सुट्टी जाहीर केली आहे. राज्यामध्ये मॉल, सिनेमागृहांवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांमध्ये खबरदारीच्या उपायांबाबत जनजागृती करण्यात आली आहे.