महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

म्हैसूर दसरा उत्सवात पी. व्ही. सिंधू राहणार उपस्थित , कर्नाटक मुख्यमंत्र्याचे निमंत्रण - कर्नाटक मुख्यमंत्र्याचे निमंत्रन

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पी. व्ही. सिंधूला म्हैसूर दसरा उत्सवात उपस्थिती लावण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

दसरा उत्सवात पी. व्ही. सिंधू उपस्थित

By

Published : Sep 14, 2019, 5:52 PM IST

बंगळुरू - ‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असं म्हणत देशभर दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी पी. व्ही. सिंधूला म्हैसूर दसरा उत्सवात उपस्थिती लावण्यासाठी निमंत्रण दिले आहे.

हेही वाचा -तेलंगाणाच्या मुख्यंमत्र्यांच्या निवासस्थानातील श्वान मेल्यानं डॉक्टरवर गुन्हा दाखल


पी. व्ही. सिंधूने म्हैसूर दसरा उत्सवात आपल्या कुटुंबासह उपस्थिती लावावी यासाठी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पत्राद्वारे निमंत्रण दिले आहे. म्हैसूर खासदार प्रताप सिन्हा, म्हैसूर पोलीस अधिक्षक रिशयंन्त यांनी मुख्यमंत्र्याच्या वतीने पत्र पी. व्ही. सिंधूला सोपवले आहे. नुकतेच पार पडलेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी. व्ही. सिंधूने जेतेपद पटकावले. तिच्या या यशाचे देशभरातून कौतुक करण्यात आले.

हेही वाचा -नागार्जूनच्या हस्ते सिंधूला बीएमडब्ल्यू भेट


कर्नाटकातील ‘म्हैसूर’ राज्यातील दसरा नाडहब्ब या नावाने ओळखला जातो. येथे साजरा होणारा दसरा इतर प्रांतांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण असतो. हा कर्नाटक राज्याचा उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून हा उत्सव सरकारमार्फत केला जातो. याला ‘चामुंडेश्वरी’चा उत्सव म्हणूनही ओळखतात. चामुंडेश्वरी देवीच्या मूर्तीची अंबारीत प्रतिष्ठापना करतात. याची नऊ दिवस राज्याच्या विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रम स्थळापासून मिरवणूक काढली जाते. हा सोहळा पाहण्यासाठी ठिकठिकाणाहून पर्यटक येतात. २५ ते ३० हत्ती या वेळी सजवतात. शहराच्या वेगवेगळ्या भागात सांस्कृतिक कार्यक्रम असतात.

ABOUT THE AUTHOR

...view details