महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारगिल युद्धात एकुलता एक मुलगा गमावलेल्या मातेची करुण कहाणी

देशासाठी शहीद झालेल्या मुलाबद्दल आजही रामचंद्री अभिमान बाळगतात. पण त्यांच्या वाटेला निराशेशिवाय दुसरे काही आले नाही. विजय भंडारी शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी, पेन्शन आणि पैसे मिळाले. पण काही काळानंतर पत्नीने दुसरे लग्न केल्याने रामचंद्री यांना त्याचा काही फायदा झाला नाही.

कारगिल युद्ध

By

Published : Jul 21, 2019, 3:32 PM IST

देहरादून- कारगिल युद्धाला 20 वर्ष उलटून गेली आहेत. मात्र, या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याला आणि बलिदानाला देश आजही विसरलेला नाही. शहीद झालेल्या वीर जवानांचा अनेक शौर्यगाथा आहेत. शहीद जवान विजय भंडारी यांच्या आईचीही अशीच एक कथा आहे. रामचंद्री यांनी आपल्या मुलाला देशासाठी अर्पण केले होते. मात्र नशिबाने त्यांच्यावर अन्याय केला आहे.

कारगिल युद्धात एकुलता एक मुलगा गमावलेल्या मातेची करुण कहाणी

देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाच्या आईला आजही दु:खात जीवन जगावे लागत आहे. 17 व्या गढवाल राईफलचे जवान विजय भंडारी लग्नासाठी सुट्टी घेऊन गावी आले होते. लग्नानंतर दहा दिवसातच त्यांना तातडीने कामावर बोलावण्यात आले. त्यामुळे पत्नी आणि आपल्या आईला निरोप देऊन विजय भंडारी युद्धासाठी रवाना झाले. मात्र ते पुन्हा कधी परतलेच नाहीत.

देशासाठी शहीद झालेल्या मुलाबद्दल आजही रामचंद्री अभिमान बाळगतात. पण त्यांच्या वाटेला निराशेशिवाय दुसरे काही आले नाही. विजय शहीद झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला सरकारी नोकरी, पेन्शन आणि पैसे मिळाले. पण काही काळानंतर पत्नीने दुसरे लग्न केल्याने रामचंद्री यांना त्याचा काही फायदा झाला नाही.

रामचंद्री यांनी आपल्या हक्कासाठी दिर्घकाळ लढा दिला. तेव्हा कुठे त्यांना शहीद मुलाच्या पेंशनचा काही हिस्सा मिळू लागला. कारगिल युद्धाला 20 वर्ष होऊन गेले. मात्र आजही त्या घरात एकटे राहून स्वत:चा उदरनिर्वाह करतात.

आपल्या शहीद मुलाबद्दल बोलताना त्या आजही गहिवरुन जातात. माझा एकूलता एक मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, या गोष्टीचा मला अभिमान आहे, अशी भावना रामचंद्री यांनी ईटीव्हीच्या टीमशी बोलताना व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details