महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अध्यक्षपदाचा पेच : कपिल सिब्बल यांनी 'ते' टि्वट घेतले मागे; जाणून घ्या घटनाक्रम... - CWC

काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आज पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादाला आज वेगळं वळण लागलंय.

अध्यक्षपदाचा पेच
अध्यक्षपदाचा पेच

By

Published : Aug 24, 2020, 4:16 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आज पक्षाच्या कार्यकारीणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादाला आज वेगळं वळण लागलंय. बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना भाजपने फूस लावल्याचा आरोप केला. त्यावरून कपिल सिब्बल यांनी टि्वट करत आपली नाराजी व्यक्त केली. दरम्यान, त्यानंतर सिब्बल यांनी ते ट्विट मागे घेतले आहे.

कपिल सिब्बल यांचे डिलिट केलेलं टि्वट -

राहुल गांधी म्हणाले की, आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली. राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसची बाजू मांडली. मणिपूरच्या सत्ता संघर्षात भाजपला खाली खेचलं. गेल्या 30 वर्षांत कोणत्याही प्रकरणात भाजपच्या बाजूने एकही वक्तव्य केलं नाही. तरीही माझ्यावर भाजपसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप केला जात आहे. हे ट्विट करत कपिल सिब्बल यांनी राहुल गांधींवरील नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, हे टि्वट केल्यानंतर काही वेळातच त्यांनी ते डिलिट केले आणि दुसरे टि्वट करत याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. 'राहुल गांधी यांनी वैयक्तिक येऊन सांगितलं की, त्यांनी अशा शब्दांचा वापर केला नाही. त्यामुळे मी माझं आधीचं टि्वट काढलं', या आशयाचे दुसरे टि्वट कपिल सिब्बल यांनी केले आहे.

काय प्रकरण?

काँग्रेसच्या 23 वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ नेतृत्व असावे, अशी मागणी करणारे पत्र सोनिया गांधी यांना लिहिले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षात 'हाय वोल्टेज ड्रामा' सुरू झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबत पत्र लिहिणाऱ्या 23 वरिष्ठ नेत्यांमध्ये कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद हे आहेत. या पत्रावरून आज बैठकीत घमासान झालं. आज बैठकीत सोनिया गांधींनी या पत्राचा संदर्भ देत त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडला. तसेच, राहुल गांधींनी देखील या पत्रावरून अनेक प्रश्न उपस्थित केले.

राजस्थान किंवा मध्यप्रदेशमधील सत्ता अडचणींमध्ये होती, तेव्हाच पत्र का नाही लिहिण्यात आले. सोनिया गांधींची प्रकृती ठीक नाही, अशा वेळीच हे पत्र का लिहिल्या गेलं, असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले. यासोबतच सुरू असलेल्या प्रकारामागे भाजपचा हात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. त्यावर कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांनी नाराजी व्यक्त केली.

गांधी कुटुंबाकडेच पक्ष नेतृत्व ठेवावं -

काँग्रेसमधील नेत्यांवर थेट विरोधकांशी हातमिळवणी केल्याचा आरोप पहिल्यादांच झाला आहे. सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर गांधी कुटुंबाकडेच पक्ष नेतृत्व ठेवावं, अशी मागणी करण्यात येत आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी राहुल हेच पक्ष नेतृत्वासाठी योग्य असल्याचा दावा केला आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) कार्यालयाबाहेर जोरदारे निदर्शन केली. पक्षाचा अध्यक्ष गांधी परिवारातूनच असला पाहिजे अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. तसेच गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी गांधी कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे पत्र लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी अथवा सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details