लखनऊ - कानपूरमध्ये एका गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. या चकमकीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश राज्यातील राजकीय वातावर पेटले असून विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यामध्ये कोणीच सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांसह समाजवादी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
कानपूरमध्ये विकास दुबे या गुंडाला पकडण्यासाठी पोलीस गेले असता गुंडांनी पोलीस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 जण हुतात्मा झाले. आज(शुक्रवार) ही घटना घडली. सात इतर पोलीस कर्मचारी जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर आरोपींना पकडण्यासाठी मोठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तर विरोधी पक्ष कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत.
उत्तर प्रदेशातील गुंडागिरीचे आणखी एक उदाहरण
आठ पोलिसांची हत्या झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. उत्तर प्रदेशातील गुंडागिरीचे आणखी एक उदाहरण. जेथे पोलिसच सुरक्षित नाहीत, तेथे नागरिक कसे सुरक्षित असतील, असे राहुल गांधी म्हणाले. प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.
सर्वसामान्य व्यक्तीपासून ते पोलीस कोणीच राज्यात सुरक्षित नाही