नवी दिल्ली - केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी कलराज मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. तर, याआधी हिमाचल प्रदेशचे राज्यपालपदी असणारे आचार्य देवव्रत यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल; आचार्य देवव्रत यांची गुजरातला बदली - राज्यपाल
भाजपमधील दिग्गज नेते म्हणून कलराज मिश्रा यांची ओळख आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योग विभागाचा स्वतंत्र कार्यभार होता.
कलराज मिश्रा1
भाजपमधील दिग्गज नेते म्हणून कलराज मिश्रा यांची ओळख आहे. २०१४ साली त्यांनी उत्तरप्रदेशातील देवरिया येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योग विभागाचा स्वतंत्र कार्यभार होता.