महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

केरळ : आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दिलेल्या धडकेत पत्रकाराचा मृत्यू - मल्याळम डेली सिराज

आयएएस अधिकारी श्रीराम वेंकटीरमन हे त्यांच्या मित्रासोबत कारमधून जात होते. यावेळी पत्रकार बशीर यांच्या दुचाकीला त्यांनी जोरदार धडक दिली.

केरळ अपघात

By

Published : Aug 3, 2019, 3:17 PM IST

तिरुवनंतपुरम- आयएएस अधिकाऱ्याच्या कारने दिलेल्या धडकेमुळे केरळमध्ये दुचाकी चालवत असलेल्या पत्रकाराचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. के. एम बशीर (३५) असे मृत्यू झालेल्या पत्रकाराचे नाव आहे. बशीर हे 'मल्याळम डेली सिराज'चे प्रमुख म्हणून काम पाहतात.

आयएएस अधिकारी आणि सर्वेक्षण प्रमुख म्हणून काम पाहत असलेले श्रीराम वेंकटीरमन हे त्यांच्या मित्रासोबत कारमधून जात होते. यावेळी पत्रकार बशीर यांच्या दुचाकीला त्यांनी जोरदार धडक दिली. अपघातानंतर बशीर यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. आयएएस अधिकारी श्रीराम यांनाही जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम यांनी घटनेबाबत माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या जवाबानुसार, अपघातावेळी त्यांचा मित्र कार चालवत होता. घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

परंतु, बशीर यांच्या मित्रांनी नातेवाईकांनी पोलीस घटनेचा तपास व्यवस्थित करत नसल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी घटनेनंतर श्रीराम यांचे रक्त तपासणीसाठी घेतले नाही. यासोबतच घटनास्थळाची व्यवस्थित पाहणीदेखील केली नाही, असे आरोप करण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details