महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आसारामला उच्च न्यायालयाचा दणका; जन्मठेपला आव्हान देणारी याचिका फेटाळली

अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी जन्मठेपेच्या शिक्षेला आव्हान देणारी आसारामची याचिका सोमवारी जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आसारामची बाजू मांडणारे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी पीडित मुलगी अल्पवयीन नसल्याचा युक्तिवाद केला आहे. ऑगस्ट 2013मध्ये जोधपूर जवळील मनाई येथील आश्रमात एका अल्पवयीन बलात्कारप्रकरणी  न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती

संग्रहित छायाचित्र

By

Published : Sep 23, 2019, 7:01 PM IST

जोधपूर -अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या शिक्षेला आव्हान देणारी आसारामची याचिका सोमवारी जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

आसारामची बाजू मांडणारे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी पीडित मुलगी अल्पवयीन नसल्याचा युक्तिवाद केला आहे. आसारामला पोस्को कायद्याच्या तरतुदीनुसार दोषी ठरवले जाऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. ही याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती विनीतकुमार माथुर यांच्या विशेष खंडपीठाने सांगितले की, घटनेवेळी पिडितेचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते हे कोर्टाने आधीच स्पष्ट केले आहे. २० ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली होती.

हेही वाचा - धुळे: 12 वर्षीय चिमुकलीवर 42 वर्षीय नराधमाचा अत्याचार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

ऑगस्ट 2013मध्ये जोधपूर जवळील मनाई येथील आश्रमात एका अल्पवयीन बलात्कारप्रकरणी न्यायालयाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आसाराम सध्या जोधपूर मध्यवर्ती कारागृहात बंद आहे. याप्रकरणी शिल्पी आणि शरद या अन्य दोन आरोपींनादेखील 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details