शोपियानमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या ५ दहशतवाद्यांना अटक - terrorists
आकिब नाजिर राठर, समीर मुश्ताक बट्ट, फैसल फारूक, रईस अहमद गनी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
श्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या शोपियानमध्ये पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली. हिजबुलच्या मॉड्यूलचा पर्दाफाश करत ही कारवाई करण्यात आली. यासह त्यांच्याकडे एक आयईडी बॉम्बही सापडला. हे दहशतवादी परिसरात स्फोटके पेरून पोलीस आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात होते.
आकिब नाजिर राठर, समीर मुश्ताक बट्ट, फैसल फारूक, रईस अहमद गनी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. सध्या पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. ही अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. यावर्षी याआधी फेब्रुवारीमध्ये दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. यात ४० जवानांना प्राण गमवावे लागले होते. तर, अनेक जखमी झाले होते.