कुलगाम - दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये ताझीपोरा येथील मोहम्मदपुरा येथे चकमक सुरू आहे. या भागात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यांना घेरण्यात आले आहे.
जम्मू-काश्मिरात दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक - security forces
यापूर्वी सुरक्षा दलांना 'मोस्ट वाँटेड' दहशतवादी झाकीर मुसा याला २४ मे रोजी ठार करण्यात यश आले होते. पुलवामा येथील त्राल येथे तो आढळून आला होता. त्याचा खात्मा हा सुरक्षा दलांच्या यशातील महत्त्वाचा टप्पा आहे.
चकमक
काल (मंगळवारी) अनंतनाग जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या गोळीबारात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तसेच, त्यांच्याकडील शस्त्रे, दारूगोळा जप्त करण्यात आला होता.