श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. यात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सकाळी चकमक सुरू झाली. याविषयी आयजीपी एस. पी. पणी यांनी माहिती दिली आहे.
जम्मू-काश्मीर : दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू, २ दहशतवाद्यांचा खात्मा - encounter
२ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अजूनही शोध मोहीम सुरू आहे. जप्त केलेल्या वस्तूंवरून हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समोर आले आहे.
चकमक
'दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू झाल्यानंतर त्यांनी आमच्यावर लपून गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरादाखल कारवाई सुरू केली. यात २ दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडील आणि हत्यारे आणि दारूगोळा ताब्यात घेण्यात आला आहे,' अशी माहिती एस. पी. पणी यांनी दिली.
'अजूनही शोध मोहीम सुरू आहे. जप्त केलेल्या वस्तूंवरून हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याचे समोर आले आहे,' असे ते म्हणाले.
Last Updated : Apr 13, 2019, 3:35 PM IST