जम्मू- पाकिस्तानने गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीकच्या भागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून सीमा चौक्यांवर केलेल्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यात लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. यश पॉल असे या २४ वर्षीय रायफलमनचे आहे. रात्री उशिरापर्यंत सुंदरबनी सेक्टरमध्ये गोळीबार सुरू होता.
बारामुल्लामध्ये चकमक; तीन जवान जखमी, २ दहशतवाद्यांचा खात्मा - soldier
पाकिस्तानने गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेनजीकच्या भागात पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून सीमा चौक्यांवर केलेल्या तोफगोळ्यांच्या जोरदार माऱ्यात लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले. यश पॉल असे या २४ वर्षीय रायफलमनचे आहे.
जम्मू
पाकिस्तानी लष्कराने गुरुवारी सकाळी सुंदरबनी आणि नौशेरा सेक्टरमध्ये दुपारी पावणेतीनच्या सुमारास शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी फौजांनी गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला, असे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आठवड्याच्या सुरुवातीला पाक लष्कराने राजौरी जिल्ह्य़ात नियंत्रण रेषेनजीक तोफगोळ्यांचा मारा आणि गोळीबार केला होता. यात एका लष्करी जवानाला वीरमरण आले. तर, ३ नागरिक जखमी झाले होते.