छिंदवाडा - मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे रॅलीला संबोधित करताना अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोहम्मद अली जीना आणि जवाहरलाल नेहरु यांचा पक्ष असून देशाचे स्वातंत्र्य आणि विकासामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते, असे म्हटले आहे. याच कारणामुळे मी या पक्षात आलो, असे वक्तव्य त्यांनी केले.
काँग्रेस जीना यांचा पक्ष, स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाच्या विकासात त्यांचेही योगदान - शत्रुघ्न सिन्हा
सिन्हा यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली तेव्हा मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्रही उपस्थित होते. कमलनाथ यांना सिन्हा यांनी केलेल्या जीनांविषयीच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी 'याविषयी मला माहिती नाही. मी ऐकले नाही,' असे उत्तर दिले.
सिन्हा मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे काँग्रेसच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते याआधी भाजपमध्ये होते. त्यांनी नुकताच काँग्रेसप्रवेश केला असून ते बिहारच्या पटना साहिब मतदारसंघाचे उमेदवार आहेत. त्यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती केली आहे. या वेळी मुख्यमंत्री कमलनाथ आणि त्यांचे पुत्रही येथे उपस्थित होते. कमलनाथ यांना सिन्हा यांनी केलेल्या जीनांविषयीच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला असता, त्यांनी 'याविषयी मला माहिती नाही. मी ऐकले नाही,' असे उत्तर दिले.
सिन्हा यांनी काँग्रेसच्या 'न्याय' योजनेची तोंड भरून स्तुती केली. त्यांच्याविरोधात भाजपाने केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. हे दोघेही कायस्थ समाजाचे आहेत. या मतदारसंघात कायस्थ समाजाची मोठी संख्या आहे.