नवी दिल्ली -झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आज (रविवार) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ५२ उमेदवारांची नावे आहेत.
झारखंड विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर.. सध्याचे मुख्यमंत्री रघुबर दास हे जमशेदपूर (पूर्व) मधून निवडणूक लढवतील. तर, भाजपचे राज्य प्रमुख लक्ष्मण गिलुआ हे चक्रधरपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. झारखंड विधानसभा निवडणूक : भाजपची पहिली यादी जाहीर.. दरम्यान, काँग्रेसनेही आजच आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये पाच उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. काँग्रेसचे राज्य प्रमुख रामेश्वर ओराओन यांनी लोहारदगामधून उमेदवारी जाहीर झाली आहे.झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांनी निवडणूकपूर्व युती जाहीर केली आहे. त्यानुसार काँग्रेस ३१, राजद सात, तर जेएमएम सर्वाच जास्त ४३ जागा लढवेल. या युतीकडून मुख्यमंत्रीपदासाठी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे नाव पुढे केले जात आहे.झारखंडमध्ये पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. ३० नोव्हेंबर ते २० डिसेंबरदरम्यान मतदान पार पडेल. तर, २३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. एकूण ८१ जागांसाठी निवडणूक लढवण्यात येणार आहे.