मध्य प्रदेश- चित्तोडगड जिल्ह्यातील मध्य प्रदेशच्या सीमेवरील जालिया चेक पोस्ट येथे ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला आहे. यात जीपमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्व महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
धुळ्यातील तिघांचा मध्य प्रदेशात मृत्यू; राजस्थानला निघाले होते फिरायला - अपघात बातमी
धुळे जिल्ह्यातील सात तरुण राजस्थानला फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान आज त्यांच्या जीपला ट्रकने समोरून धडक दिली. यात जीपमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-'व्हॅलेंनटाईन डे'निमित्त मावळच्या गुलाबाची मागणी वाढली, १० दिवसात ८० लाखांचे उत्पन्न
धुळे जिल्ह्यातील सात तरुण राजस्थानला फिरण्यासाठी निघाले होते. दरम्यान आज (शनिवारी) त्यांच्या जीपला ट्रकने समोरून धडक दिली. यात जीपमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अब्दुल पिंजारा, महेन्द्र पारीक, गिरिश मराठा असे त्यांची नावे आहेत. तर यात हेमंत पाटील, नवदीप जिरासे, निलेश पांवरा व स्वराज पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी उदयपूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.