कुरुक्षेत्र - प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देशभरामध्ये विविध अभियान राबवले जात आहेत. हरियाणामधील एका युवा गटाने प्लास्टिकच्या बॅगपासून कासव तयार केला असून लोकांना प्लास्टिक न वापरण्याचा संदेश दिला आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिक मुक्तींचा संदेश देणाऱ्या हरियाणाच्या ऋतुची प्रेरणादायी कहाणी
प्लास्टिकचा वापर करून तयार करण्यात आलेल्या कासवाची लांबी 23 फूट असून रुंदी 6.6 एवढी आहे. शहरातील विद्यार्थिनी ऋतु हीने एनआयसीच्या 100 युवकांना सोबत घेऊन कासव तयार केला आहे. ऋतुने आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून पर्यावरण संशोधन विषयात मास्टर्स केले आहे.
ऋतुच्या वडिलांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर तीने कर्करोगाला सर्वांत मोठे कारण ठरणाऱ्या प्लास्टिकविषयी लोकांना जागरूक करण्याचा संकल्प केला. तीच्या टीमेने प्लास्टिकपासून बनलेला हा सर्वांत मोठा कासव असल्याचा दावा केला असून त्यांनी जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान सिंगापूरमध्ये २१ एप्रिल २०१२ ला प्लास्टिकपासून ऑक्टोपसची एक आकृती बनविली गेली होती. सध्या त्या आकृतीची विश्वविक्रमात नोंद आहे. हा कासव ऑक्टोपस रेकार्ड तोडण्यासाठी आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याच्या संदेश देण्यासाठी तयार केली आहे.
कासव एक जीव आहे. जो पाणी आणि जमिनीवर राहू शकतो. कासवाचे आयुष्य जवळपास 300 वर्ष असते. मात्र प्लास्टिकचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम पसरले आहेत. त्यामुळे कासवाची आयुष्यदेखील कमी झाले आहे, असे ऋतुने सांगितले. ऋतुने उचललेले पाऊल नक्कीच प्रंशसनीय आहे.