श्रीनगर -पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा एक जवान हुतात्मा झाला आहे.
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान हुतात्मा - श्रीनगर
पाकिस्तानच्या सेनेने राजौरीतील सुंदरबनी भागात लहान हत्यारे आणि मोर्टारने भारतीय जवान आणि नागरिकांना लक्ष्य बनवत गोळीबार सुरू केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सेनेने राजौरीतील सुंदरबनी भागात लहान हत्यारे आणि मोर्टारने भारतीय जवान आणि नागरिकांना लक्ष्य बनवत गोळीबार सुरू केला. यादरम्यान भारताचा एक जवान गंभीर जखमी झाला. रुग्णालयात जवानाला उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला.
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी माहिती देताना सांगितले, की पाकिस्तानच्या सेनेकडून सोमवारी संघर्ष विरामाचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत भारताचा एक जवान हुतात्मा झाला आहे.