शामली - जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एरिया कमांडरने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील शामली रेल्वे स्थानकही बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.
योगी आदित्यनाथ, केजरीवालांसह मोहन भागवतांना बॉम्बने उडवण्याची धमकी - mohan bhagvat
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. जैश ए मोहम्मदचा एरिया कमांडर मैसूर अहमद याने हे पत्र पाठवून धमकी दिली आहे.
या धमकीचे पत्र शामली रेल्वे स्थानकाच्या पोस्ट ऑफिसमध्ये आले होते. स्टेशन मास्तर विक्रांत यांच्या नावे हे पत्र आले आहे. जैश-ए-मोहम्मदचा एरिया कमांडर मैसूर अहमद याने हे पत्र पाठवले आहे. या पत्रात 13 मे ला शामली, बागपत, मेरठ, हापुड, गजरौला, गाजियाबाद, मुजफ्फरनगर, बरेली, दिल्ली, पानीपत आणि रोहतक ही रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.
16 मे रोजी इलाहाबादमधील संगम मंदिर, काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्येतील राम जन्म मंदिर, गाजियाबादमधील हनुमान मंदिर आणि दिल्लीतील प्रमुख मंदिरांसह बस स्थानकालाही उडवण्याची धमकी दिली आहे.