महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जयपूर : आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी 4 जणांना अटक, 4.19 कोटींची रोकड जप्त - Betting on IPL in rajasthan

नलाइन सट्टेबाजीविरूद्ध मोठी कारवाई करत जयपूर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चार कोटी 19 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. बेटिंगचे धागे-दोरे दुबईशी जोडलेले असल्याचे आढळले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीचा संपूर्ण व्यवसाय दुबईमध्येच चालविला जात आहे आणि वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून लोकांकडून आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा खेळवला जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सट्टेबाजी
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सट्टेबाजी

By

Published : Oct 22, 2020, 1:06 PM IST

जयपूर -ऑनलाइन सट्टेबाजीविरुद्ध मोठी कारवाई करत जयपूर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी चार कोटी 19 लाख रुपयांची रक्कम जप्त केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून क्रिकेटवर सट्टा लावण्याच्या ऑनलाइन साइटचे आयडी-पासवर्ड आरोपींनी एकमेकांना पाठवले होते आणि त्यानंतर कोडवर्डमध्येच सट्टेबाजीच्या व्यवहाराची चर्चा होती.

बेटिंगचे धागे-दोरे दुबईशी जोडलेले असल्याचे आढळले आहे. ऑनलाइन सट्टेबाजीचा संपूर्ण व्यवसाय दुबईमध्येच चालविला जात आहे आणि वेगवेगळे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून लोकांकडून आयपीएल सामन्यांवर ऑनलाइन सट्टा खेळवला जात आहे.

जयपूरमध्ये आयपीएल सट्टेबाजीप्रकरणी 4 जणांना अटक, 4.19 कोटींची रोकड जप्त

कोट्यवधी रुपयांसह 4 आरोपींना अटक

'कोतवाली पोलीस ठाण्यासह आयुक्तालयांतर्गत विशेष पथकासह संयुक्त कारवाई करीत किशनपोल मार्केटमध्ये कोट्यवधी रुपयांसह 4 आरोपींना अटक करण्यात आली. ही कारवाई करत पोलिसांनी रणबीर सिंह, कृपालसिंग, तोडरमल राठोड आणि ईश्वरसिंग यांना अटक केली आहे,' असे अतिरिक्त पोलीस आयुक्त मेघचंद चंद मीणा यांनी सांगितले.

हेही वाचा -सर्व दहशतवादी मदरसामधूनच वाढले; मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्र्यांचे वक्तव्य

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सट्टेबाजी

आरोपी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवून सट्टा खेळण्यास इच्छुक लोकांना त्यामध्ये सहभागी करून घेत होते. यानंतर एका ऑनलाइन वेबसाइटद्वारे त्यांचा आयडी आणि पासवर्ड तयार केला जात असे. यानंतर सट्टा खेळवला जात असे. आरोपींना पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी कोडवर्डमध्ये पैशांचा व्यवहार दाखवला जात असे आणि इतरांच्या नावावर सट्टा लावला जात असे.

आरोपींनी प्राथमिक चौकशीत या संपूर्ण जाळ्याचा मुख्य सूत्रधार राकेश नावाची व्यक्ती असल्याचे सांगितले आहे. ही व्यक्ती दुबईत असून देशातील अनेक राज्यांमध्ये डायमंड एक्सचेंज वेबसाइटद्वारे ऑनलाइन आयडी-पासवर्ड तयार करून लोकांकडून सट्टा खेळवला जात असे. जी व्यक्ती सट्टा जिंकत असे, त्याची माहिती व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवरून दुबईला पाठवली जात असे. यानंतर हवालाच्या माध्यमातून जिंकलेली रक्कम आरोपींपर्यंत पोहोचवली जात असे. यानंतर जिंकलेल्या व्यक्तीला हवालामार्फतच जिंकलेली रक्कम पाठवली जात असे.

पोलिसांना संशयास्पद वाटू नये, म्हणून मंदिरांच्या नावावर तयार केले व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप

पोलिसांनी पकडले गेलेले चार आरोपी अतिशय अट्टल गुन्हेगार आहेत. त्यांनी ऑनलाइन सट्टेबाजी करण्यासाठी मंदिरांच्या नावावर व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप तयार केले होते. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या 9 मोबाइल फोनमध्ये 30 हून अधिक व्हॉट्सअ‌ॅप ग्रुप असल्याचे आढळले आहे. विविध मंदिरांची नावे या ग्रुपना देण्यात आली आहेत. सध्या या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे. ऑनलाइन सट्टेबाजी नेटवर्कशी जोडलेल्या इतर काही लोकांची नावेही चौकशीत उघडकीस येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -लालूंच्या सुनेकडून विरोधी पक्षाचा प्रचार, नितीशकुमारांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचे जनतेला आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details