महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

माजी केंद्रीय मंत्री अन् काँग्रेस नेते जयपाल रेड्डी अनंतात विलिन - डी.के अरुणा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्यावर आज (सोमवारी) सांयकाळी नेकलेस रोड येथील पी.व्ही घाटाजवळ अत्यंसंस्कार  पार पडले आहेत.

माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी अनंतात विलिन

By

Published : Jul 29, 2019, 7:30 PM IST

हैदराबाद -काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्यावर आज (सोमवारी) सांयकाळी नेकलेस रोड येथील पी.व्ही घाटाजवळ अत्यंसंस्कार पार पडले आहेत. न्यूमोनियाचा त्रासाने शनीवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे निधन झाले होते.


कर्नाटकचे सीएलपी नेते सिद्धरामैय्या, कर्नाटकचे माजी सभापती रमेश कुमार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, मल्लिकाअर्जुन खरगे, व्ही हनुमंता राव, तेलंगणाचे मंत्री तलासणी श्रीनिवास यादव, टीआरएसचे खासदार डी. श्रीनिवास आणि भाजप नेत्या डी.के अरुणा उपस्थित होत्या.


रेड्डी यांना मागील काही दिवसांपासून न्यूमोनियाचा त्रास होता. यामुळे त्यांच्यावर गच्चीबावली येथील एशिअन गेस्ट्रो एन्टरोलॉजी रुग्णालात उपचार सुरू होते.


जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 ला पूर्वीच्या आंध्र प्रदेश आताचा तेलंगणामधील महबूबनगर जिल्ह्यात झाला होता. लोकसभेवर ते तब्बल 5 वेळा निवडून गेले होते. तर दोन वेळा राज्यसभेचे ते सदस्यही होते. इंद्रकुमार गुजराल आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार सांभाळला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details