महाराष्ट्र

maharashtra

कोलकात्यातील विद्यापीठ बनवणार स्वस्त दरात उच्चप्रतीचे मास्क..

By

Published : Apr 6, 2020, 2:04 PM IST

विद्यापीठाच्या उपयुक्त सामाजिक तंत्रज्ञान केंद्रामार्फत (सीएएसटी) हे संशोधन सुरू आहे. या मास्कचा प्रोटोटाईप तयार करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या कापडापासून हे मास्क तयार केले असल्याची माहिती संशोधकांनी दिली.

Jadavpur University working on three-layer fabric masks using low-cost materials
कोलकात्यातील विद्यापीठ बनवणार परवडणाऱ्या दरात उच्चप्रतीचे मास्क..

कोलकाता- पश्चिम बंगालच्या जाधवपूर विद्यापीठातील संशोधकांनी नव्या प्रकारचा मास्क बनवला आहे. तीन स्तरीय फॅब्रिकचा वापर करून हा मास्क तयार करण्यात आला आहे. हा मास्क उच्च दर्जाचा असून, याचे कमी दरात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्याबाबत विद्यापीठ सध्या संशोधन करत असल्याची माहिती मिळाली आहे.

विद्यापीठाच्या उपयुक्त सामाजिक तंत्रज्ञान केंद्रामार्फत (सीएएसटी) हे संशोधन सुरू आहे. या मास्कचा प्रोटोटाईप तयार करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. बाजारात सहज उपलब्ध असणाऱ्या कापडापासून हे मास्क तयार केले असल्याची माहिती संशोधकांनी दिली.

या मास्कचे बाहेरचे दोन थर पॉलीप्रॉपिलेन फॅब्रिकपासून बनले आहेत. तसेच, या दोन्हीच्या मध्ये कापसाचा एक थर देण्यात येणार आहे. शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर जे सूक्ष्मकण उस्तर्जित केले जातात, त्या सर्वांना हा मास्क अडवू शकतो. तसेच, या मास्कमुळे श्वसनातही अडथळा येत नसल्याचे विद्यापीठाने सांगितले आहे.

हा मास्क आपण केवळ शिलाई यंत्राच्या सहाय्याने, किंवा हाताने शिवूनदेखील तयार करू शकतो. तसेच लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर विद्यापीठाची मुख्य प्रयोगशाळा उघडल्यास याबाबत मोठ्या प्रमाणावर संशोधन करता येईल, असेही सीएएसटीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :रतलाममध्ये रेल्वेच्या बोगी होणार आयसोलेशन वॉर्ड, काम जोरात सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details