श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक घडली. यामध्ये भारतीय जवानांना तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याचे संरक्षण प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी सांगितले.
जम्मू कश्मीरच्या कुलगामधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - कुलगाम चकमक
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सोमवारी चकमकी भडकल्यानंतर तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भारतीय जवानांच्या गस्तीवर असलेल्या पथकावर अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमकी उडाली.
जम्मू कश्मीरच्या कुलगामधील चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील काझीगुंडा परिसरातील लोअर मुंडा येथे गस्तीवर असलेल्या जवानांच्या पथकावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यावर ही चकमक सुरू झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनीही गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले असल्याचेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.