श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अवंतीपूरामध्ये गुरुवारी सकाळीपासून सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. अवंतीपुराच्या माघमा आणि त्राल भागांमध्ये सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. यासोबतच, पुलवामामध्येही एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे.
जम्मू-काश्मीर : अवंतीपूरा-पुलवामामध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार; तर बडगाममध्ये जवान हुतात्मा! - अवंतीपूरा चकमक
अवंतीपुराच्या माघमा आणि त्राल भागांमध्ये सुरू असलेल्या या चकमकीत आतापर्यंत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले आहे, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली आहे. तर दुसरीकडे, बडगाममध्ये एका सीआरपीएफ जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे.
जम्मू-काश्मीर : अवंतीपूरामध्ये चकमक सुरू; एक दहशतवादी ठार!
तर दुसरीकडे, बडगाममध्ये एका सीआरपीएफ जवानाला वीरमरण प्राप्त झाले आहे. काही दहशतवाद्यांनी या जवानाची रायफल काढून घेत, त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. जी. डी. बादुले असे या हुतात्मा जवानाचे नाव आहे. यानंतर या भागामध्ये दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
Last Updated : Sep 24, 2020, 10:54 AM IST