श्रीनगर -दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यामुळे यात्रेकरुच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. या आशयाचे पत्रक जम्मू-काश्मीर सरकारने जारी केले आहे. तर यात्रेकरूना लवकरात लवकर परतण्यास सांगितले आहे.
अमरनाथ यात्रा स्थगित : यात्रेवर दहशतवादाचे सावट, यात्रेकरूंना परतण्याच्या सूचना - दहशतवाद
दहशतवादी अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे.
अमरनाथ यात्रा स्थगित
अमरनाथ यात्रेच्या मार्गावर भुसुरुंग आणि स्निपर रायफल सापडली असल्याची माहिती राज्याचे महासंचालक दिलबाग सिंह आणि लष्कराच्या चिनार कॉर्पसचे लेफ्टनंट जनरल के. जे. एस धिल्लोन यांनी संयुक्त पत्रकार परिषदमध्ये दिली आहे.
या वर्षात दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी १० गंभीर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुन्ना लाहोरी, कामरान, उस्मान यांसारखे दहशतवाद्यांना पकडण्यात आले, असे पोलीस महा निरिक्षक एस. पी पानी यांनी सांगितले.
Last Updated : Aug 2, 2019, 7:45 PM IST