नवी दिल्ली - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले असता त्यांना पालिकेने क्वारंटाइन केले आहे. बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी पालिकेच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
'हे चुकीचे आहे. न्यायालयाने विनय तिवारी यांच्याबाबत चौकशी केल्यानंतर पालिका त्यांना क्वारंटाइन मुक्त करेल, अशी आशा होती. मात्र, बीएमसीकडून कोणतेही सकारात्मक उत्तर आले नाही. विनय यांना सक्तीने क्वारंटाइनमध्ये ठेवणे म्हणजे नजरकैदत ठेवल्याप्रमाणे आहे. अॅडव्होकेट जनरल यांच्यासोबत सल्लामसलत केल्यानंतर काय कारवाई करावी, हे आम्ही ठरवू. न्यायालयात जाणे हादेखील एक पर्याय आहे' असे पांडे म्हणाले.