महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इटलीतील कोरोनाग्रस्त दाम्पत्यातील पत्नीची टेस्ट 'निगेटिव्ह'; पती अजूनही 'पॉझिटीव्ह' - कोरोना संसर्ग

उपचार सुरू असताना दोघांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये पत्नीची कोरोना टेस्ट नकारात्मक आली असून पती एंड्री कार्ल यांची टेस्ट अजूनही सकारात्मक आली आहे.

सवाई मानसिंग रुग्णालय
सवाई मानसिंग रुग्णालय

By

Published : Mar 10, 2020, 12:04 PM IST

जयपूर - इटलीतून भारतात आलेल्या परदेशी दांम्पत्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मागील एक आठवड्यापासून जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात आयसोलेशन वार्डमध्ये दोघांवर उपचार सुरू आहेत.

इटलीतील कोरोनाग्रस्त दांम्पत्यातील पत्नीची टेस्ट 'निगेटिव्ह'

उपचार सुरू असताना दोघांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये पत्नीची कोरोना टेस्ट नकारात्मक आली असून पती एंड्री कार्ल यांची टेस्ट अजूनही सकारात्मक आली आहे. २४ तासानंतर पुन्हा दोघांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. २४ तासानंतर पत्नीची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुर्णत: बरे झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे.

संपूर्ण राजस्थानात ३२० नागरिकांना कोरोना झाल्याच्या संशयावरून तपासणी करण्यात आली. त्यातील ३१६ नमुने नकारात्मक आले आहेत. आणखी चार जणांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे राजस्थानला कोरोनापासून दिलासा मिळताना दिसत आहे. राज्य सरकारकडून जगजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details