नवी दिल्ली -उत्तर प्रदेशमधील हापूर येथील वाहतूक पोलिसांकडून नवनवे पराक्रम केले जात आहेत. एका ट्रक चालकाला विनाहेल्मेट वाहन चालविल्यामुळे चलनाची नोटीस पाठवल्याचा प्रकार घडला आहे.
ग्रहमुक्तेश्वर येथील एका ट्रक चालकाला हेल्मेट न घातल्यामुळे आणि ड्रायव्हिंग लायसन्स न बाळगल्यामुळे चलनाची नोटीस गेली. 'मी या संबधीत माहिती मागवली. चौकशीअंती ही टायपोग्राफिक त्रुटीमुळे नोटीस चूकून गेल्याचे स्पष्ट झाले. चलन रद्द केले जाईल', असे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.