महाराष्ट्र

maharashtra

इस्रोच्या वैज्ञानिकाची हैदराबादमध्ये हत्या, अज्ञात आरोपीचा शोध सुरू

By

Published : Oct 2, 2019, 1:23 PM IST

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. एस. सुरेश असे या वैज्ञानिकाचे नाव आहे.

एस. सुरेश

हैदराबाद- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकाची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. एस. सुरेश असे या वैज्ञानिकाचे नाव आहे. हैदराबादमधील अमीरपेठ भागातील अन्नपूर्णा अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ते मृतावस्थेत आढळून आले. एस. सुरेश हैदराबादमधील इस्रोच्या अखत्यारीतील नॅशनल रिंमोट सेंसिग सेंटरमध्ये मागील २० वर्षांपासून कार्यरत होते.

इस्रोच्या वैज्ञानिकाची हैदराबादमध्ये हत्या

अज्ञात व्यक्तीने सुरेश यांची हत्या केली. ते मुळचे केरळचे असून मागील २० वर्षांपासून हैदराबादमधील नॅशनल रिंमोट सेंसिग सेंटरमध्ये कामाला होते. मंगळवारी कामावर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्यानं सहकाऱ्यांनी सुरेश यांच्या पत्नी इंदिरा यांना याबाबत माहिती दिली. त्या बंगळुरु येथे बँकेमध्ये नोकरी करतात.

माहिती मिळताच सुरेश यांच्या पत्नी कुटुंबीयांसह हैदराबादला पोहचल्या. तसेच पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. फ्लॅटचा दरवाचा उघडला असता सुरेश मृत अवस्थेत आढळून आले. कठीण वस्तूने डोक्यात प्रहार केल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच पुरावे गोळा करण्यात आले. सुरेश हैदराबादमध्ये मागील २० वर्षांपासून राहत होते. त्यांच्या पत्नी देखील हैदराबादमध्ये नोकरी करत होत्या. मात्र, २००५ साली त्यांची बदली बंगळुरु येथे झाली. सुरेश यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला असून मुलगी नवी दिल्ली येथे आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details