चेन्नई - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे सध्या चंद्रभोवती फिरणाऱ्या ऑर्बिटरमधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने (ओएचआरसी - ऑर्बिटर हाय रिझॉल्युशन कॅमेरा) घेतली आहे. इस्रोने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ती पोस्ट केली आहेत.
इस्रोच्या माहितीनुसार, ऑर्बिटरने 100 किलोमीटर उंचीवरून ही छायाचित्रे घेतली आहेत. ही 'बोगस्लाव्स्की ई क्रेटर'ची असून याची साधारण १४ किलोमीटर व्यास आणि ३ किलोमीटर खोली आहे. याच्या आजूबाजूचा भाग चंद्रावरील दक्षिण ध्रुवीय प्रदेशात येतो.