नवी दिल्ली -भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चांद्रयान २ लवकरच पुढील टप्प्यात पोहोचत असल्याची खुशखबर दिली आहे. ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चंद्रावर 'सॉफ्ट लाँच' करणारा हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे अशा प्रकारची चांद्रमोहीम आखणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन यांच्यानंतरचा चौथा देश ठरणार आहे.
चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबरला पोहोचणार - इस्रो - भारत
चांद्रयान २ मुळे भारतीय शास्त्रज्ञांना चंद्राच्या भूपृष्ठाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सध्या भारताने चांद्रयानाच्या माध्यमातून अभ्यासाठी निवडलेल्या प्रदेशात आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही.
इस्रो
चांद्रयान २ मुळे भारतीय शास्त्रज्ञांना चंद्राच्या भूपृष्ठाचा अभ्यास करणे शक्य होणार आहे. सध्या भारताने चांद्रयानाच्या माध्यमातून अभ्यासाठी निवडलेल्या प्रदेशात आतापर्यंत कोणताही देश पोहोचलेला नाही. चांद्रयान २ मध्ये एका ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरचा समावेश आहे. या सर्वांची मिळून चांद्रयानची एकंदर रचना करण्यात आली आहे. चंद्रावर सॉफ्ट लाँच करण्याच्या उद्देशाने आखलेली ही भारताची पहिलीच मोहीम आहे.