नवी दिल्ली - भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम हे आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळला जातो आहे. आज दिल्ली उच्च न्यायालयाने पुन्हा त्यांचा जामीन अर्ज फेटाळत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.
आयएनएक्स मीडिया प्रकरण : चिदंबरम यांची जेलवारी कायम, पुन्हा फेटाळला जामीन अर्ज - पी. चिदंबरम
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असणाऱ्या पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज आज पुन्हा फेटाळला गेला. दिल्ली उच्च न्यायालयाने हा निर्णय घेत, त्यांची न्यायालयीन कोठडी कायम ठेवली आहे.
हेही वाचा : भाजपने दिले भाजीवाल्याच्या मुलाला विधानसभेचे तिकीट
मागील आठवड्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आणि भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्याबद्दल त्यांचे पुत्र कार्ती यांनी दोघांचेही आभार मानले होते.
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना २१ ऑगस्टला अटक करण्यात आली होती. सध्या ते दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत.
हेही वाचा : आयएनएक्स मीडिया प्रकरण : पी. चिदंबरम यांच्या वकिलाचे दिल्ली उच्च न्यायालयाला प्रत्युत्तर..