चंदीगढ - हरियाणातील कुरुक्षेत्र येथे २३ नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाला सुरुवात होत आहे. यानिमित्त येथे विविध कला, हस्तकला, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. १० डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
गीता महोत्सवानिमित्त ब्रह्मा सरोवराच्या काठावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांचे विविध कार्यक्रम होतील. ३ डिसेंबरला संपूर्ण गीता पठण, गीता यज्ञ आणि प्रदर्शन आणि स्टेट पॅव्हिलियनचे उद्घाटन तसेच, आंतरराष्ट्रीय गीता सेमीनारचे उद्घाटन होईल, असे शासनाच्या प्रवक्त्याने सांगितले.