नवी दिल्ली - लडाख प्रांताच्या पूर्वेला स्थित गलवान व्हॅलीत चीनी सैन्याने घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ला चढवला. या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. तर चीनी सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिघळले आहेत. सध्या चीनकडून पुन्हा द्विपक्षीय चर्चेची मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत सरकारच्या सद्यस्थितीतील पवित्र्यावर भाष्य केले. दोन्ही देशांतील संबंधांबाबात स्वातंत्र्यापासून पुढे आलेल्या मुद्द्यांचा उहापोह केला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये ,असा सल्ला त्यांनी दिला.
नेहरूंनी केलेली चूक पुन्हा मोदींनी करू नये - सुधींद्र कुलकर्णी - sudhindra kulkarni interview
लडाख प्रांताच्या पूर्वेला स्थित गलवान व्हॅलीत चीनी सैन्याने घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ला चढवला. या झटापटीत २० भारतीय जवानांना वीरमरण आले. तर चीनी सैन्याची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी चिघळले आहेत. सध्या चीनकडून पुन्हा द्विपक्षीय चर्चेची मागणी होत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९६० साली केलेली चूक मोदींनी पुन्हा करू नये असा सल्ला त्यांनी दिला.
नेहरूंच्या काळात चीन आणि भारत आर्थिक, राजकीय पातळीवर समान होते. त्यावेळी तत्कालीन चीन पंतप्रधान चोऊ इन लाई यांनी अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश यांसंदर्भात भारतासमोर प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये अरुणाचल प्रदेशच्या बदल्यात भारताने अक्साई चीनचा मोठा भूभाग चीनला देण्याची मागणी करण्यात आली होती. जम्मू आणि काश्मीर वरील भारताचा अधिकार मान्य करण्यास चीन तयार झाला होता. तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यासाठी काही प्रमाणात तयारी दर्शवली. मात्र तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांनी याला विरोध दर्शवला. 'देशाची एकही इंच जमीन देणार नाही', असा जोर विरोधकांनी लावला. त्यावेळी हा प्रश्न सोडवता आला असता. मात्र नेहरूंनी चूक केली. आता पंतप्रधान मोदी यांनी सीमावादाचा हा प्रश्न असाच भिजत ठेवल्यास ते नेहरूंच्या चूकीची पुनरावृत्ती करतील, असे मत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मोदींकडे मोठ्या प्रमाणात जनसमर्थन आहे. याचा फायदा त्यांनी उठवावा. ही चूक आत्ताच सुधारता येऊ शकते, असा आशावाद पत्रकार कुलकर्णी यांनी व्यक्त केलाय.